मालेगाव (वृत्तसंस्था) गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असताना नदीत पडलेल्या जवानांना वाचवताना मालेगाव तालुक्यातील छटा साकुरी झाप येथील सचिन मोरे हे शहीद झाले आहेत.
गलवान खोऱ्यात सीमा वादाबाबत शांततापूर्ण चर्चेसाठी चीन सैनिकांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांवर चीनच्या सैनिकांनी हल्ला केला होता. तब्बल तीन तास ही हिंसक झडप सुरू होती. चीनच्या सैनिकांनी पहिल्यांचा हल्ला करत दगडफेक केली आणि त्यानंतर काठीने मारहाण करण्यास सुरुवाद केली आणि हा वाद पेटला. यावेळी नदीत पडलेल्या आपल्या सहकारी जवानांना वाचवताना सचिन मोरे हे शहीद झाले. शहीद सचिन मोरे यांना वीरमरण आल्याने त्यांची आई, वडील, पत्नी, मुलांसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. साकुरी गावावर शोककळा पसरली आहे.