जळगाव प्रतिनिधी । मालवाहू रिक्षाचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बेंडाळे चौकात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संजय यशवंत राणे (वय-५१) रा. जळगाव यांचे बेंडाळे चौकात गोदावरी पेंटहाऊस नावाचे दुकान आहे. दुकानावर रंग विक्रीचे दुकान ग्राहकांसाठी त्यांना दुकानावरच थांबावे लागते. १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकान लावून ते घरी जेवणसाठी (एमएच १९ बीएच ३२९६) क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना दुकानापासून हाकेच्या अंतरावर समोरून येणाऱ्या मालवाहू (एमएच १९ एस ९४४१) क्रमांकाची रिक्षाने धडक दिल्याने संजय राणे हे रोडावर फेकले गेल्याने जखमी झाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रिक्षा चालक भरत अर्जून बिबे रा. मोहन नगर टॉकीज जवळ याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.