जळगाव, प्रतिनिधी । मालधक्का स्थलांतर प्रकरणी नुकतेच वृत्तपत्रातून वाचले. पाळधी नव्हे तर शिरसोली आमचे म्हणणे आहे कि, मालधक्का स्थलांतर कुठेही करा पण लवकर करा अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवदेनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, भोईटे नगर, भिकमचंद नगर, म्हाडा कॉलनी, दुध फेडरेशन व इतर ४-५ हजार लोक ह्या सिमेंट धुळीमुळे त्रस्त आहे. रोज ४०० ते ६०० ट्रकची आवक-जावक त्यात सिमेंट धुराळा व पिंप्राळा रेल्वे गेटवर ट्राफिक जाम नेहमीचे अपघात. रिंगरोड मार्गे अवजड वाहतूक बंद असतांना जड वाहतूक सुरु आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने एकदा नाही तर दोन वेळा अहवाल दिला. मालधक्का येथील प्रदूषण पातळी अतिउच्चतम असून श्वसनास अतिशय घातक आहे असे नमूद केले आहे.
या ठिकाणी राहणाऱ्या अनेक २०-२२ वर्षाच्या तरुणांना गंभीर स्वरूपाचे श्वसनाचे, फुफुसाचे आजार झाले आहे. त्याचे पुरावे सोबत देत आहे. आपणाला सुद्धा जाणीव आहे.कि मालधक्का स्थलांतर बोलण्या इतके सोपे नाही. आम्ही त्याचा कुंभकर्णी अनुभव दहा वर्षांपासून घेतो आहे. २०१५ मध्ये रेल्वे प्रशासनाने ४०-५० कोटी खर्च अपेक्षित आहे. असे सांगितले होते शिवाय ह्या कामाच्या परवानग्यांना किती वर्ष आणखीलागतील शासकीय लालफितीत अडकून धुळीने त्रस्त नागरिकांनी केवळ पेपरच्या बातम्या वाचून रोगीच व्हायचे काय… कि अजून, दहा वर्ष नवीन परवानग्या साठी वाट पाह्यची.
मा.माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन व खासदार उन्मेष पाटील यांनी दिलासा वाटेल अशी बातमी दिली व लगेच पाळधी नाही तर शिरसोलीला हि बातमी वाचली. यामुळे धूळग्रस्त नागरिक आणखी भीतीग्रस्त झाले. कारण सुरत लाईन-पाळधी येथे ६० टक्के इन्फ्रास्ट्रक्चर आधीच आहे. येथील व्यापारी तयार आहे. या लाईन वर रेल्वे मंत्रालय आधीच, हा कारोबार करत आहे. राष्ट्रीय मार्ग लागुन आहे. पुन्हा मुंबई लाईनवर- शिरसोलीला करायचा म्हणजे रेल्वे मंत्रालय सबंधित व्यापारी, जागा, परवानग्या- शून्यातून सुरवात म्हणजे नागरिकांच्या श्वसनाशी खेळच होणार आहे. तरी आमची तुम्हाला व सर्व मंत्री महोदयांना विनंती आहे. कि आम्हा हजारो लोकांना स्थलांतर राजकारणात न ढकलता धुळीतून सुटका द्या. व लवकर मालधक्याला धक्का द्या.