जळगाव । मालगाडीच्या वॅगनवर चढलेल्या तरूणाचा वीज वाहिनीस लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहरातील बजरंग बोगद्याजवळ घडली.
याबाबत माहिती अशी की, योगेश गुलाब मराठे (वय २०, रा.अष्टभुजा मंदिर परिसर, खोटेनगर) हा मित्रांसह रेल्वेरुळालगत विशाल यादव, नीलेश घाटे या मित्रांसह उभा होता. तेवढ्यात एक मालगाडी येथे थांबली. योगेश एका डब्यावर चढला. डबा गोल असल्याने त्याचा तोल गेल्याने त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या हाताचा स्पर्श उच्चदाब असलेल्या वीज वाहिनीला झाला. यामुळे त्याला विजेचा तीव्र धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश हा अभियांत्रिकीच्या दुसर्या वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याच्या वडिलांचा स्टोन क्रशर मशीनचा व्यवसाय आहे. पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे.