फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मारुळ येथील एका महिलेचा छेडखाणीवरून मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मारुळचे उपसरपंचासह ११ आरोपींविरुद्ध महिलेची छेडखानी जातीवाचक शिवीगाळ तसेच दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मारुळ येथील एका महिलेची आरोपी अकिल्लोउद्दीन मोहिनोउद्दीन फारुकी याने छेडछाड केली. या कारणावरून संदीप श्रावण तायडे हे मोबाईल दुकानात रिचार्ज करीत असतांना आरोपी अकिल्लोउद्दीन मोहिनोउद्दीन फारुकी, तकियोउद्दीन मोहिनोउद्दीन फारुकी, जलीलोउद्दीन जहिरोउद्दीन फारुकी, इतिहाजोद्दीन फारुकी, अस्लम फारुकी अब्दूल फारुकि, व जलीलोउद्दीन फारुकी यांचे चार मुले यांनी लाठ्याकाठ्या व हत्यारानिशी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत फिर्यादी राहुल कौतिक तायडे, संदीप श्रावण तायडे, आनंदा राहुल तायडे, आकाश रविंद्र तायडे, प्रदीप गौतम तायडे सर्व रा. मारुळ हे जखमी झाले आहे. याप्रकरणी राहुल तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दंगलीचा विनयभंगाचा व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या पार्टी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते. तपास डीवायएसपी नरेंद्र पिंगळे सपोनि प्रकाश वानखडे करीत आहे