जळगाव प्रतिनिधी | सोशल मीडीयावर व्हायरल व्हिडिओत तरुणाला मारहाण करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता ही घटना जळगाव शहरातील असोदा रोड परिसरात घडल्याचे सांगत संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी तरुणाला मारहाण झाली. या तरुणाच्या तक्रारीवरुन चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्या चार जणांपैकी एकाला शहराच्या बाहेर नेण्यात येवून झाडाला बांधून मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हिडीओ मारहाण करणारा तरुण हातात कुठल्यातरी वस्तूने तरुणाला मारहाण करत आहेत. याठिकाणी गर्दीही दिसून येत आहे. तर गर्दीतीलच कुणीतरी चोरुन हा व्हिडीओ केल्याचे व्हिडीओवरुन समोर येते. दरम्यान, या व्हिडीओची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. घटना जळगाव शहरातील आसोदा रोड परिसरातील असून मार खाणारा तरुण हा शहर पोलीस ठाण्यात दाखल खूनाच्या घटनेतील आरोपी तर मारहाणा शनिपेठे परिसरातील एका टोळीचा प्रमुख तसेच आरोपी असल्याची माहिती आतापर्यंतच्या चौकशीत समोर आले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/204135498578425