Home Cities जळगाव मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी स्वाती बाविस्कर यांची निवड

मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीसपदी स्वाती बाविस्कर यांची निवड

0
28

जळगाव प्रतिनिधी | येथील ख्यातनाम सुवर्ण व्यापारी किशोर बाविस्कर (दापोरेकर) यांची कन्या स्वाती किशोर बाविस्कर यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलींद दहिवले यांनी स्वाती बाविस्कर यांची नियुक्ती केली आहे. स्वाती बाविस्कर यांनी केलेल्या सामाजिक कामांची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून मानवाधिकारांची जोपासना करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. या नियुक्तीबद्दल स्वाती बाविस्कर यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound