यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथील ॲड. देवकांत पाटील यांची मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष विक्की राजपूत यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
अँड. देवकांत पाटील हे मागील आठ ते दहा वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य करत आहे. या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून मिळालेल्या जबाबदारीचे संधी म्हणून सोनं करुन जिथे -जिथे मानवाधिकारांचे उलंघन होऊन तिथे अन्याय होईल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू. व मानवाधिकार बरोबरच त्यांचे संरक्षण करुन या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेश अध्यक्ष विकी राजपूत, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोहर चौधरी, परिषदेचे उप प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष ॲड. सतीष ताके यांच्यासह परिषदेच्या संघटनेचे कडून, मित्र परिवार, तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.