मानराज पार्कजवळ मोबाईल लांबविणारे चोरटे पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मानराज पार्कजवळ पायी जाणाऱ्या तरूणावर चाकूने वार करून जखमी करत हातातील मोबाईल लांबविणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यातील एक संशयित आरोपी अल्पवयीन आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अविनाश सोनवणे हा आपल्या कुटुंबियासह बांभोरी येथे वास्तव्याला आहे. शहरातील मानराजपार्क समोरील नवजिवन शुपर शॉपच्या बाजूला राहणारे सुशिल साळुंखे यांच्याकडे वाहनचालक म्हणून नोकरीला आहे. १४ फेब्रुवारी रोजी अनिवाश दिवसभर ट्रीप करून सायंकाळी मालकाकडे रात्री १०.३० वाहन लावले आणि घरी जाण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी मानराज पार्कजवळील दिलासा व्यसनमुक्ती केंद्रासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोनजण दुचाकीने आले. हातातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसवल्याने अविनाश यांनी मागे बसलेल्या तरूणाला लागलीच पकडले. यातील एकाने चाकू काढून अविनाश यांच्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संशयित आरोपी रणजीत उर्फ बबुल हिरालाल जोहरे (वय-१९) रा. शिवाजी नगर हुडको जळगाव आणि अल्पवयीन मुलगा यांना दुधफेडरेशन शिवाजी नगरात परिसरातून अटक केली आहे. त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९ डीजे ५०१७) आणि मोबाईल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content