मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोतवालांच्या मानधन वाढीचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून याचे येथे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
२०२३ च्या अर्थसंकल्पात कोतवालानकरिता जाहीर झालेल्या मानधन वाढीचा शासन निर्णय नुकताच पारित करण्यात आला. याबद्दल महाराष्ट्राराज्य कोतवाल संघटना तालुका शाखा मुक्ताईनगर,जिल्हा जळगांव येथील कोतवालांनी राज्य शासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,तसेच महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे मार्गदर्शक आमदार मंगेश चव्हाण व कोतवालांचा प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याकरिता सहकार्य करणारे तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष बगळे यांचे आभार मानले आहेत.
कोतवाल म्हणजे महसूल प्रशासनातला शेवटचा व स्थानिक घटक.यांच्या सुखदुखात कायमच सोबत असणारे सर्व अधिकारी , महसूल कर्मचारी,मंडळ अधिकारी, तलाठी, वाहन चालक,शिपाई व इतर कर्मचारी, नागरिक तसेच कार्यालयात कामानिमित्त आलेले शेतकरी उपस्थित सर्वांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी , प्रविण चिखलकर राज्य उपाध्यक्ष, दिलीप सावळे, कडू सोनवणे, सुनिल खराटे, मिथुन मुढाले, दुर्गेश संगळकर, राजू गोरले, राजू कोळी,सुधाकर भोळणकर, लहू खिरोडकर,आदी कोतवाल उपस्थित होते.