मातीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्राॅली महसूल पथकाकडून जप्त

 

रावेर प्रतिनिधी  । मातीची वाहतुक करणारे ट्रॅक्टर-ट्राॅली  आज रावेर महसूल पथकाने पकडले असून सावदा पोलिस स्टेशनला जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे माती वाहतुक करणा-यांमध्ये एकच  खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे आज अवैध गौण खनिज पथकाने माती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर-ट्रॉली गाते ते सावदा रस्तावर पकडून जप्त करण्यात आले आहे. हे ट्रॅक्टर सावदा पोलीस स्टेशन येथे जमा केले. सदर पथकात मंडळ अधिकारी खिरोदा, मंडळ अधिकारी खिर्डी, तलाठी सावदा, तलाठी कोचुर बु, तलाठी बालवाडी, तलाठी चिनावाल, तलाठी रायपूर, तलाठी उधळी, तलाठी कांडवेल, तलाठी वाघोदा, तलाठी दसनूर, व कोतवाल रायपूर,व इतर कर्मचारी होते.

तर  माती होती म्हणून सोडले होते ट्रॅक्टर

दरम्यान महसूल पथकाने आज मातीचे ट्रक्टर टॉली जप्त केले असतांना दि १० फेब्रुवारी रोजी दंड न घेता सोडलेले होते व प्रांतधिकारी कैलास कडलक यांच्याकडे दिलेल्या खुलास्यांमध्ये त्या ट्रक्टर ट्राॅली  मध्ये देखील माती असल्याचे  सांगून प्रकरणाची सावरासावर केली होती तर आज महसूल पथकाने मातीचेच ट्रक्टर जप्त आहे.

 

Protected Content