माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क नाही, सध्या तरी दिल्या घरी खुश : वैभव पिचड

अहमदनगर (वृत्तसंस्था) माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी सध्या तरी दिल्या घरी खुश आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली आहे.

 

काही दिवसापासून इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु आहे. यावर आता स्वतः वैभव पिचड यांनी भूमिका व्यक्त केली आहे. माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी सध्या तरी दिल्या घरी खुश आहे. काल परवा काही वृत्तवाहिन्यांनी ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते पुन्हा आधीच्या पक्षात परतणार असल्याच्या बातम्या दाखवल्या. यात माझाही फोटो दाखवून तसे सांगण्यात आले. मात्र, मी अनेक वृत्तवाहिन्यांशी संपर्क करुन माझा खुलासा केला आहे. माझ्याशी अद्याप कुणाचा संपर्कही झालेला नाही. तसेच माझा सध्या घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. मी आहे त्या घरात सध्या तरी खुश आहे, असेही पिचड म्हणाले.

Protected Content