चाळीसगाव: प्रतिनिधी । वातावरणीय बदल विभाग ( महाराष्ट्र शासन ) यांच्यामार्फत वसुंधरा संवर्धनाकरीता माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे नगरपरिषदतर्फे आज सकाळी शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
. याप्रसंगी नफाराध्यक्ष व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रदुषणाला आळा घालण्यासाठी व इलेक्ट्रिक ( विद्युत ) वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी माझी वसुंधरा अभियानतर्फे शहरात सायकल रॅलीचे आयोजन मुख्यधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. इंधनाची बचत व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यात मोफत चार्जिंग पॉईंट नगरपरिषदेच्या आवारात उभारण्यात आले आहे.असे प्रतिपादन शंकर गोरे यांनी केले. भविष्यात विद्युत वाहने वाढली तर चार्जिंग पॉईंटही वाढविण्यात येणार. असल्याचे त्यांनी नमूद केले. सायकल रॅली प्रसंगी नगराध्यक्ष आशाताई चव्हाण तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.