नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील काही दिवसांपासून शहा यांच्या आरोग्यावरून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा उठल्या होत्या. परंतु, स्वतः शहांनी आपल्या ट्विटर हँडलवर याचे स्पष्टीकरण जारी करताना या सर्व केवळ अफवा असल्याचे सांगून आपली प्रकृती ठणठणीत असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असेही आवाहन केले आहे.
मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली अशी सुरुवात करत अमित शाह यांनी कामात व्यस्त असल्याने आपण या अफवांकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. मात्र पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आज आपण ठणठणीत असल्याचे मला सांगावे लागत असल्याचेही शाह यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटवरुन ‘माझ्या तब्बेतीची चिंता करणाऱ्या सर्वांसाठी माझा संदेश’ या कॅप्शनसहीत एक निवेदन ट्विट केले आहे. हिंदू धर्माानुसार अशा प्रकारच्या अफवा प्रकृती आणखी ठणठणीत ठेवतात. यामुळे मी अशा सर्व लोकांकडून एकच आशा व्यक्त करतो, की यापुढे तुम्ही मला माझे काम करू द्याल आणि स्वत:ही कराल. तुमच्याप्रती माझ्या मनामध्ये कोणताही द्वेष नसल्याचे शहा यांनी म्हटले आहे.