जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आले असून ते रद्द करण्यात यावे अशी मागणी दिव्यांग बांधवांतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात आज बुधवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली असून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दिव्यांग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी तब्बल आठ आठ महिने वाट बघावी लागते. असे असतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे जिल्ह्याचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या मोठ्या नेत्याला जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयातून ६० टक्के दिव्यांग असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र १२ ऑगस्ट २०२१ रोजी दिले गेले. त्यात ६० टक्के दिव्यांग असल्याचे नमूद केले आहे. असे असतांना ते बऱ्याच वेळा प्रवास करतांना व राजकीय सभा घेत आहे. त्यामुळे त्यांचे अपंगात्वाचे प्रमाणपत्र हे बोगस असून याची चौकशी करण्यात येवून प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संजय राठोड, गणेश निकम, गणेश वाणी, शेख बिलाल शेख कदीर, डी.एस. बाविस्कर यांच्यासह आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.