जळगाव प्रतिनिधी । माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी यांनी आपल्या निवासस्थानी राज्य सरकारच्या विरोधातील माझे आंगण…माझे रणांगण या आंदोलन सहभाग घेतला.
याबाबत वृत्त असे की, शुक्रवारी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात ठाकरे सरकारचा निषेध करणारे आंदोलन करण्यात आले. यात पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. माजी आमदार डॉ. गुरूमु जगवाणी यांनी आपल्या निवासस्थानी या आंदोलन सहभाग घेतला. हातात राज्य सरकारचा निषेध करणारा फलक घेऊन ते या आंदोलनात सहभागी झाले.