Home धर्म-समाज माजी आ.जावळे यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करा; फैजपूर भाजपातर्फे निषेध

माजी आ.जावळे यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करा; फैजपूर भाजपातर्फे निषेध


फैजपूर प्रतिनिधी । भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांना ३३ दिवसानंतर खुन करण्याची धमकी देणाऱ्या संशयित आरोपीस तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी फैजपूर भाजपातर्फे निषेध व्यक्त करत निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे यांना ३३ दिवसानंतर खुन करण्याची धमकी जळगाव येथील राजेंद्र आर. पवार या इसमाने मोबाईलने संदेश पाठवला आहे. फैजपूर भाजपातर्फे निवेदनाद्वारे जाहीर निषेध करण्यात येवून त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची व हरिभाऊ ना पोलीससंरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनावर फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहेते, नपा भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, ता.उपाध्यक्ष नितीन नेमाडे, माजी तालुकाध्यक्ष नितीन राणे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, रवींद्र होले, संजय सराफ, प्रतिक वारके, नगरसेविका शकुंतला भारंबे, पप्पू चौधरी, दीपक होले, हरिभाऊ सराफ, नितीन बोरोले, सुनील दुसाने, संदीप होले, श्याम भंगाळे यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या स्वाक्षरी आहेत. संचारबंदी लक्षात घेत सदर निवेदन अध्यक्ष अनंता नेहेते, नितीन नेमाडे, संजय सराफ, प्रतीक वारके, सुनिल दुसाने, सोशल डिस्टन द्वारे फैजपूर सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना देण्यात आले.


Protected Content

Play sound