अमळनेर, प्रतिनिधी । शहरात गेल्या दीड महिन्यापासून कोरोना सदृश्य आजारामुळे अनेक व्यावसायिक व हातमजुरी करणा-या कुटुंबाना काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या कुटुंबियांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील किरणा मालाचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे.
लॉक डाऊनमुळे हाताला काम नसल्याने व्यावसायिक व हातमजूर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आहे. याचे सामाजिक भान जपत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सुमारे५०० कुटुंबांना प्रत्येकी ३५० रुपयांचा किराणा मालाचे वाटप केले. यात युवा परीट समाज लॉन्ड्री व्यावसायिक ५०, नाभिक सलून व्यावसायिक १५०, घरगुती कामगार महिला १५०, ख्वाजा नगर येथील मुस्लिम समाजातील १००, इराणी समाजातील ३० यांना आज रविवार दि. ३ मे रोजी माजी .आमदार पाटील यांच्या हस्ते किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विक्रांत पाटील, बाबू साळुंखे, रवी पाटील आदी उपस्थित होते. तर यावेळी युवा परीट समाजाचे अध्यक्ष अमृत जाधव उपाध्यक्ष रविंद्र जाधव, गोरख चित्ते, गणेश नेरकर, अनिल वाल्हे, गंगाराम वाल्हे, नाभिक समाजाचे अध्यक्ष मधुकर सैदाने, उपाध्यक्ष नंदलाल जगताप सहसचिव भिकन सैदाने, आप्पा पगारे,अशोक सूर्यवंशी, खजिनदार दिलीप सोनवणे रघुनाथ खोंडे, अशोक ठाकरे, राजेंद्र ठाकरे, शेखर वारुळे आदी उपस्थित होते.