माजी आमदार नरेंद्र पवार यांचा जळगाव दौरा

जळगाव, प्रतिनिधी । ‘भटके-विमुक्त आघाडी’ महाराष्ट्र प्रदेश संयोजक: माजी आमदार नरेंद्र पवार व त्यांच्या सोबत प्रदेश टीम  यांची ‘उत्तर महाराष्ट्र विभाग संपर्क अभियान अंतर्गत जळगाव येथे दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थित उद्या शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

माजी आमदार नरेंद्र पवार हे  उद्या शनिवार ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०० वा महेश प्रगती जवळ “संघाच्या शाखेला भेट” देणार आहेत. यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०:०० वा ”जळगाव शहर व ग्रामीण पद अधिकारी यांची बैठक व भटक्या जमाती व विमुक्त जाती आघाडी नियुक्ती पत्र वाटप” करण्यात येणार.  दुपारी १२  ते १  मान्यवर  मार्गदर्शनकरणार आहेत.  जळगाव जिल्ह्यातील सर्व भटके विमुक्त समूहातील सर्व समाजातील मान्यवरांनी सदर बैठकीस उपस्थिती दयावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील,जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शालीक पवार, शहरअध्यक्ष भूषण लाडवंजारी, सरचिटणीस अनिल जोशी यांनी आवाहन केले आहे.

 

Protected Content