Home आरोग्य मागील २४ तासांत ६६ हजार ५५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद !

मागील २४ तासांत ६६ हजार ५५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांत ६६ हजार ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, १००७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २४ लाख पार झाला आहे. देशात सध्या आता २४ लाख ६१ हजार १९० रुग्ण आहेत. देशातल कोरोनाचे ६ लाख ६१ जार ५९५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत ४८ हजार ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकमेव दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १७ लाख ५१ हजार ५५५ रुग्ण निरोगी झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी तब्बल ४१३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आज ११ हजार ८१३ नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ६० हजार १२६ एवढी झाली आहे. राज्यात आज नऊ हजार ११५ रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


Protected Content

Play sound