पाचोरा, प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्ग बहुजन कल्याण मंञालय यांच्यातर्फे इयत्ता १० वी व १२ वी मध्ये राज्यात व विभागीय परीक्षा मंडळात येणाऱ्यांना स्व. वंसतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या मंत्रालयातर्फे नाशिक विभागातून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील चौघांची निवड करण्यात आली असून यात पाचोरा येथील अबोली दादाभाऊ मांडगे या विद्यार्थिनीचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्ग बहुजन कल्याण मंञालय यांच्या मार्फत सन २०१७ पासुन विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील इयत्ता १० वी व १२ वीमध्ये राज्यात व विभागीय परीक्षा मंडळात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थीनींसाठी स्व. वंसतराव नाईक गुणवंत पुरस्कार दिला जात असतो.
सन २०१८ – १९ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत पुरस्कारासाठी नाशिक विभागातुन चार विद्यार्थी व विद्यार्थींनीची निवड झाली आहे. यात चौघेही विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील असुन इयत्ता १० वीत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या पाचोरा येथील अबोली दादाभाऊ मांडगे, तेजस लिलाधर लोखंडे (भुसावळ) तर इयत्ता १२ वी परिक्षेत यश संपादन केलेले प्रांजल विलास सोनवणे (जळगाव) व यश सुनिल इंगळे (भुसावळ) अशी विद्यार्थी व विद्यार्थींनीची नावे आहेत. पाचोरा येथील अबोली दादाभाऊ मांडगे या विद्यार्थीनीस आज दि.२० रोजी ५१ हजार रुपयांचा धनादेश समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन कल्याण मंञालयाच्या दिशा निर्देशानुसार प्रत्यक्ष घरी जाऊन दिला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थींनीचे वडील दादाभाऊ मंडगे व आई उपस्थित होते. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा आणि गुणवंत पुरस्कार मिळाल्या बद्ल समाजकल्याण नाशिक प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, समाजकल्याण जळगाव सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी अभिनंदन केले.