जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील गारखेडा जवळ असलेल्या जिनीगंच्या परिसरात आलेले माकडे हाकतानां उंच पत्राचा शेडवरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा जळगाव येथे उपचारा दरम्यान कामगाराचा म्रुत्यु झाला.
सविस्तर माहिती अशी की, गारखेडा शिवारातील विजया फायबर्स या जिनिंगमध्ये कामावर असलेला सुनील रोकडे (वय४०) हा कामगार काल दिनांक १६च्या संध्याकाळी जिनिंग परिसरात आलेले माकडे उंच पत्राच्या शेडवर चढून हुसकावून लावत होता. यावेळी सुनिल रोकडेचा शेडवरून तोल जावून तो खाली पडला. उंचावरून पडल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत काल संध्याकाळी जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान सूनिल रोकडेचा मृत्यू झाला.