चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मांदुर्णे येथील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले विद्यालयात सन १९९८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘स्नेहसंमेलन मेळावा – २०२०’ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचा माजी विद्यार्थी सहा.पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक संचालक एकनाथ दोधा पाटील तर प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक आर.के. माळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद होते. यावेळी स्वागत गीताने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक – राजर्षी शाहु महाराज , भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर शाळेतील स्वर्गवासी शिक्षक कै. व्ही.डी. माळी, कै.हिरामण गुरूजी , माजी विद्यार्थी कै. साहेबराव महाले, कै.पोपट पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून भावपुर्ण श्रद्धाजंली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संचालक मंडळ सर्व गुरूजन वर्ग व माजी विद्यार्थी यांचा परिचय दिपक पाटील व प्रमोद पाटील यांनी करून दिला. त्यांनतर सर्व मान्यवरांचे स्वागत मानाचा फेटा घालुन व ग्रंथ – गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक वाय.डी. माळी, डब्ल्यु.डी. माळी , आर.एस. मन्सुरी , विश्वनाथ महाजन यांना माजी विद्यार्थ्यांनी ड्रेस – टोपी – रुमाल – ग्रंथ – गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माजी विद्यार्थी प्रमोद पाटील यांच्या संकल्पनेतुन मेळाव्याला आलेले सर्वच मान्यवरांना जवळ – जवळ १०० ग्रंथ भेट देण्यात आले. यामध्ये विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले , शिवजयंतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले , महामानवांची ओळख , सावित्रीमाईंचा जन्मोत्सव, देशाचे दुश्मन अशा ग्रंथाचा समावेश होता.
माजी विद्यार्थी साहेबराव महाजन , दिपक पाटील, शितल पाटील , प्रमोद पाटील यांनी मनोगतातून शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल २२ वर्षानंतर हे सर्व माजी विद्यार्थी सहकुंटूब – सहपरिवार आले होते. शाळेचे संस्कार – शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन या जोरावर आम्ही पोलीस अधिकारी , अभियंता , डॉक्टर , शिक्षक , बिल्डर , शेतकरी , व्यवसायीक अशा विविध उंचीपर्यंत पोहचलो, अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्यात. शाळेचे मुख्याध्यापक आर.के.माळी , उपशिक्षक एन.एस. महाजन , एम.एस. महाजन यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळाव्याचे कौतुक केले. या क्षणाने आम्ही भारावुन गेलो. हा क्षण आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे .खरचं आमचे विद्यार्थी आमचा अभिमान आहे असे प्रतिपादन केले.
शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी सन १९९८ ( इ.१०वी ) च्या माजी विद्यार्थ्यांकडुन गावातील मुलांना डिजीटल शिक्षण घेता यावे म्हणुन शाळेला ४२ इंचीचा डिजीटल टीव्ही भेट देण्यात आला. शाळेची बॅचमेट ज्योती बिरारी हीचे पती मा.चंद्रकात बिरारी हे सुद्धा हा कार्यक्रम पाहुन भारावुन गेले. त्यांनी स्नेह मेळाव्याचे कौतुक केले. यापुढे आजन्म इ.१० वी तुन प्रथम येणाऱ्या मुलाला त्यांच्याकडुन रोख १००० रू. व सन्मानचिन्ह दरवर्षी भेट देणार असे आश्वासन दिले. व सौ.माधुरी दिपक पाटील यांनी सुद्धा हा सोहळा दिव्य आहे. आम्ही सर्व महीला भारावुन गेलो. मेळाव्याचे उत्तम नियोजनाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.एकनाथ दोधा पाटील यांनी या स्नेह मेळावा – २०२० चें खुपच कौतुक केले. अशा कार्यक्रमांची आज नित्तांत आवश्यकता आहे. शाळेतील मुलांना अशा कार्यक्रमातुन प्रेरणा मिळते.परिसरातुन या स्नेहमेळाव्याची स्तुती करण्यात आली. यानंतर शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद पाटील तर आभार दगडू पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व इ.१०वी चे बॅचमेट ( सन – १९९८ ) यांनी सहकार्य केले.