यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली गावांतर्गत येणाऱ्या महेलखेडी ते कोरपाली दरम्यान कॉक्रिटीकरण केलेल्या रस्त्याच्या साईट पट्ट्याचे रखडलेले काम ठेकेदाराने त्वरीत पुर्ण करावे असे निवेदन काँग्रेस ग्रामीण सेवा फाऊंडेशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरपावली गावाअंतर्गत येणाऱ्या महेलखेडी ते कोरपावली गावातुन जाणाऱ्या मार्गाचे लाखो रुपयांची निधी खर्च करून काँक्रिट रस्ता मागील पाच महीन्यांपुर्वी संबंधीत ठेकेदाराने तयार केला. मात्र या कॉक्रीट रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या साईडपट्टयाचे काम झाले नसल्याने या गावाशी जोडला गेलेल्या प्रमुख मार्गावर शेतकरीपासून तर सर्वसामान्य नागरीकांची नेहमीच वर्दळ असते, अशा या रस्त्यावर वारंवार दुचाकी व मोटर वाहनांचे अपघात होत आहे. यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजी घेवून तात्काळ दोन दिवसात या काँक्रिटी रस्त्याच्या दोघ बाजुस साईड पट्टयांचे काम ठेकेदाराकडून करून घ्यावे, अशी मागील सेवा फांऊडेशन काँग्रेस ग्रामीणचे जळगाव जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.