यावल, प्रतिनिधी | फैजपुर येथे नुकत्याच भारत निवडणूक आयोग अंतर्गत दहाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने बी.एल.ओं.च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल होते. या कार्यशाळेत थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापक महेद्र देवरे यांचा उष्कृष्ट बी.एल.ओ. म्हणून गौरव करण्यात आला.
उष्कृष्ट बी.एल.ओ. म्हणून थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापक महेद्र देवरे यांना उष्कृष्ट बी.एल.ओ. म्हणून उपविभागीय अधिकारी अभीजीत थोरबोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देउन गौरवण्यात आले. फैजपुर येथील जेटीएम तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्व.डिगंबर शेठ नारखेडे सभागृहात दि.२५ रोजी मतदार दिनी पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील, जळगाव मनपाचे आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे जळगाव जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोठे ,फैजपूरचे प्रांतअधिकारी डॉ. अजित थोरबोले, यावलचे तहसिलदार जितेंद्र कुंवर ,रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे ,प्राचार्य पी.पी.चौधरी(फैजपूर) आदी मान्यवर उपस्थित होते. महेद्र देवरे यांची उष्कृष्ट बी.एल.ओ. म्हणुन गौरवण्यात आल्या बद्दल थोरगव्हाण शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर झुरकाळे, विनोद भालेराव, निलेश पाटील सह पदाधिकारी यांनी कौतुक केले.