जळगाव प्रतिनिधी । कोवीड रूग्ण महिलेच्या उपचारासाठी आवश्यकता असतांना व्हेंटीलेटरची सुविधा न मिळाल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना निलकमल हॉस्पिटलमध्ये आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली. संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील सामानांची तोडफोड केली असून संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
अधिक माहिती अशी की, संगिता पांडूरंग पाटील ५० रा. जिल्हा बँक कॉलनी यांना कोवीड निमोनिया झाल्याने २९ सप्टेंबर रोजी शहरातील निलकमल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १० ऑक्टोबर पर्यंत रोजी कोरानाचे स्वॅब घेतले होते याचा रिपोर्ट उद्या १२ ऑक्टोबर रोजी येणार होता. मात्र आज सकाळी संगिता पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांच मुलगा महेंद्र पाटील यांना कळविण्यात आले. महेंद्र पाटील हे हॉस्पिटलमध्ये पोहचताच त्यांच्या आईचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती महेंद्र पाटील यांना मिळताच आई गेल्याचा आक्रोश केला. मयत महिलेचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
दरम्यान, कोरोना पॉझिटीव्ह असतांना निमोनियाची काही लक्षणे आढळले. आज त्यांना साधा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना व्हेंटीलेटरवर त्यांचे उपचार सुरू ठेवावे अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. मात्र डॉक्टरांनी फक्त ऑक्सीजन लावून उपचार सुरू ठेवले. आज दुपारी १२ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रूग्णाला व्हेंटीलेटरची आवश्यकता असतांना फक्त ऑक्सीजनवर उपचार सुरू ठेवल्या आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. या ठिकाणी बराच वेळ गोंधळ सुरू असतांना नातेवाईकांनी निलकमल हॉस्पिटलमधील सामनाची तोडफोड सुरू केली. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा करणारे ऑक्सीजन सिलेंडर काढून फेकले. तर कॅबिनमधील सामानांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या तोडफोडमध्ये एका तरूणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
यापुर्वी महिलेवर उपचारासाठी नातेवाईकांनी ३५ हजार रूपये भरले तर आज ५० हजार रूपये भरूनही महिलेवर वेळेवर उपचार केले नाही, तर संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आईचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा असा आरोप मयत महिलेचा मुलगा महेंद्र पाटील यांच्यासह नातेवाईकांनी घेतला आहे. हा प्रकार होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी भेट देवून गोंधळ शांत केला.