पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे महिलेच्या राहत्या घरातून दोन जणांनी ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून येण्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पार्वताबाई प्रभाकर सोनवणे (वय-५५) रा. देऊळगाव गुजरी ता. जामनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पार्वताबाई सोनवणे या घरी नसताना गावात राहणाऱ्या दिव्या गोकुळ सोनवणे आणि कल्पनाबाई गोकुळ सोनवणे यांनी महिलेच्या घरात सुटकेस मधील ठेवलेले ७० हजार रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पार्वताबाई सोनवणे यांनी शनिवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी म्हणून दिव्या गोकुळ सोनवणे आणि कल्पनाबाई गोकुळ सोनवणे यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिंपी करत आहे.