अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील पैलाड भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून अनोळखी व्यक्तीने बँक खात्यातून ५१ हजार ७०० रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुरुवार १ मे रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील पैलाड भागात सविता प्रल्हाद पाटील वय 35 या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँकेच्या एटीएम कार्डचा गैरफायदा घेवून २६ मे रोजी आणि २९ मे रोजी या दोन दिवसात महिलेला कोणतीही माहिती नसताना बँक खात्यातून एटीएमच्या मदतीने प्रत्येकी ४० हजार आणि ११ हजार ७०० असा एकूण ५१ हजार ७०० रुपयांची फसवणूक करून चोरी केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलने गुरुवार १ जून रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहे.