धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी महिलेचा मध्यरात्री विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका खेड्या गावात ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १ जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणारा पंकज तुकाराम पाटील (वय-२६) या तरूणाने महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पंकज पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.