जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात घरात घुसून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
जळगाव तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी आकाश ऊर्फ भैय्या रमेश सोनवणे हा आला. त्याने घरात घुसून महिलेचे दोन्ही हात धरुन विनयभंग केला, तसेच तक्रार किेली, तुला व तुझ्या घरातील लोकांना मारुन टाकेल अशी धमकीही आकाश याने महिलेला दिली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आकाश ऊर्फ भैय्या रमेश सोनवणे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहेत.