पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील आर्शिवाद रेसिडेन्सी भागात एका ३० वर्षीय विवाहितेचा मृतदेह राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहितेने आत्महत्या केली नसुन तिचा घातपात झाला असल्याचा संशय माहेरच्या मंडळींकडुन व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा येथील आशिर्वाद रेसिडेन्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या निलिमा अशोक पाटील (वय – ३०) या विवाहितेचा मृतदेह आज २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. निलिमा पाटील हिच्या अकस्मात मृत्यूची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच पाचोरा ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला. निलिमा पाटील हिचा शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्यानेच तिने आत्महत्या केली असावी असा संशय नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून निलिमा पाटील हिचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडुन होते.