भुसावळ, प्रतिनिधी । समाजातील स्त्री पुरुष विषमतेवर भाष्य करीत महिलांनी स्वावलंबी होऊन जागरूक राहून विषमता दूर केली पाहिजे तसेच महिलांनी आपल्या कार्यक्षमतेवर आणि गुणवत्तेवर सर्व स्थरातील विषमता दूर केली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. अलका नाईक यांनी केले. त्या अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. प्रदीप नाईक, डीआरएम विवेक कुमार गुप्ता , एडीआरएम मनोज कुमार सिन्हा , सिनि डीपीओ एन. डी. गांगुर्डे उपस्थित होते.
डॉ. अलका नाईक यांनी पुढे सांगितले की., उच्च शिक्षण घेतले पाहिजे ज्यामुळे शिक्षणातील भेदभाव दूर होतील, आर्थिक स्वावलंबन स्त्री पुरुषां तील आर्थिक विषमता दूर करेल. आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येक स्त्रीचा निरोगी आणि निरामय जीवन हा अधिकार आहे. मला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ही सबब टाळली पाहिजे. डॉ. प्रदीप नाईक म्हणाले की, हीच खरी समानता पती पत्नीने एकमेकांची सोबत करणे एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे एकदुसऱ्याला मान सन्मान देणे हे आवश्यक आहे. तसेच ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या तसेच तसेच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.