जळगाव, प्रतिनिधी । येथील महानगरपालिकेची महासभा उद्या 12 रोजी मनपाच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन होंत आहे. सभेत कोविड सेंटर, सफाईचा ठेका, कर्मचारी भरती असे विषय मंजूर होतील अशी माहिती महापौर भारती सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती ॲड. शुचिता हाडा, सभागृह नेते ललित कोल्हे, भाजपा गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मागील पाच महिन्यानंतर प्रथमच होणाऱ्या ऑनलाईन महासभेत काही सामाजिक संस्थांना भूखंड देण्याविषयी ठराव मांडले जाणार आहे. बालवाडी शिक्षकाच्या मानधनात वाढ करणे व बालवाडी मदतनीस याना 4200 रुपये मंजूर करण्यात येणार आहे. 100 कोटी रुपयांपैकी शासनाकडून 58 कोटी निधी येणे बाकी आहे. तो येण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी गटनेते भगत बालाणी यांनी केली. भाजपच्या काही नगरसेवकांच्या वोर्डात पालकमंत्री यांनी निधी मिळवून दिला आहे.
दिव्यांग बचत गटांना महापालिकेत उपहारगृहासाठी संधी द्यावी असा प्रस्ताव महासभेत येणार आहे. 2013 पासून आस्थापना भरती नाही. 940 रिक्त पदे आहेत. सात वर्षात 3 लोक अपात्र झालेत. त्यांना कामावर घ्यावे अशी मागणी आहे. अनुकंपासाठी एकही आदेश नाही. रिक्त जागा भराव्यात म्हणून आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे मागणी करणार आहेत. 60 कर्मचारी कामावर तत्काळ कामावर घेता येईल ते घ्यावे ही मागणी आहे. या महासभेत 20 प्रशासकीय तर 11 अशासकीय असे 31 प्रस्ताव मांडले जाणार आहेत. त्यावर चर्चा होणार आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1621356484712401/