Home Cities चोपडा महावीर पतसंस्थेतील ठेवी काढण्याच्या ओघ सुरूच …..!

महावीर पतसंस्थेतील ठेवी काढण्याच्या ओघ सुरूच …..!

0
36


चोपडा, प्रतिनिधी । शहरातील महावीर पतसंस्थेच्या गैरकारभारामुळे पतसंस्थेतुन लाखो रुपयांचा ठेवी ठेवीदार काढून घेऊन गेले व आजही ठेवी काढण्याचा ओघ सुरूच आहे.

मागील काही महिन्यातच महावीर पतसंस्थेतून लाखो रुपयांच्या ठेवी निघाल्याचे बोलले जात आहे. सुरळीत चालणारी संस्थेतेला गालबोट लावण्याचे काम काही कर्मचाऱ्यांनी केलेअसल्याचे गावात बोलले जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी तर संचालक मंडळाला हाताशी धरून आम्ही सर्व धुतल्या तांदुळाचे असा आव आणला. परंतु तो आव त्यांच्याच माथी पडला. संस्था डबघाईस येऊन गेली तोपर्यंत संस्थाचालकांना ही बाब का लक्षात आली नाही हेही एक मोठे कोडे आहे. संस्थाचालकानी करोडो रूपयांच्या घेतलेल्या कर्जाची वसुली होऊन ठेवीदारांना न्याय मिळावा हीच रास्त अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..


Protected Content

Play sound