मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे. त्यामुळे या निवडणुका घेण्याबाबत सरकारने पावले उचलावीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, देशाचे भविष्य ठरवण्याची ताकद तरुणांमध्ये आहे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा झाल्या पाहिजेत. वय ८० झालं पण विचार पद्धती जूनी नसल्याचे ते म्हणाले. २२ फेब्रुवारी रोजी ५२ वर्षांपुर्वी याच दिवशी मी विधानसभेवर आमदार झालो होतो. ५० वर्षात अनेक घटना घडल्या, सुरुवातीला 5 वर्ष अभ्यास करून सदनात गलो मग सत्तेतच संधी मिळाली, त्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात चढ उतार येत असतात, पराभव झाला तर नाउमेद होऊ नये, पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज व्हावे, असेही पवार यांनी तरुणांना सांगितले.