जळगाव संदीप होले | महावितरणच्या एका ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून या मनमानीच्या विरोधात लव झाडगे या कामगाराने महावितरणच्या मुख्यालयाच्या समोर उपोषण करत आहेत.
जळगाव झोनमध्ये बरेच नॉन टेक्निकल मुले कागदपत्रके पडताळणीमध्ये बाद होत आहेत. मग ५३६ परिपत्रकानुसार संबंधित जे कोणी अधिकारी समितीमध्ये असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लव झाडगे यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या कित्येक वर्षापासून बोगस कागदपत्र संबंधित कंत्राटदार, कामगार व प्रशासनाची सुद्धा फसवणूक केली आहे व मी गेल्या दोन वर्षापासून संघर्ष करीत आहे. तरी संबंधित कंत्राटदार धमकी देतो की टेंडर बाद झाले तरी चालेल पण तुला कामावर घेणार नाही. प्रमुख मागण्या उमेश सुधाकर बानाईत हा कंत्राटी कामगार भुसावळ विभागात नाहाटा कॉलेज युनिटला, बोगस अपंग सर्टिफिकेट (पायाने अपंग) आणले आहे तसेच तो पोल वरील कामे करत आहे त्यावर कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्र तांत्रिक प्रशिक्षीत बेरोजगार संस्था नाशिक, पवन इलेक्ट्रिकल नाशिक, ए.के.मार्केटिंग अहमदनगर, M/s डी.एम. दहिफाळे बिड लेबर कॉन्ट्रॅक्टर या कंत्राटदारांना काळया या यादीत समावेश करावा. जे टेक्निकल मुले कंत्राटदाराने हेतू पुरस्कार कमी केले आहेत त्यांना कामावर पूर्ववत घ्यावे. जळगाव शहर व ग्रामीण मधील कंत्राटी कामगारांची अदयाप पर्यंत कागदपत्रके पडताळणी झालेली नाही ती त्वरीत करावी. याउपोषणात लव झाडगे यांच्यासह नेमिलाल राठोड, सतीश खंडू मोरे (भडगाव), शेख अनवर(भुसावळ) , चंद्रकांत मराठे (नशिराबाद), उमेश सोनवणे यांनी सहभाग घेतला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/4480018138708221