जळगाव प्रतिनिधी । केंद्राने राज्यसरकारकडून आरक्षणाचे सर्व अधिकार काढून घेतले आहे. केंद्राकडून निधीबाबत दुजाभाव केला जात आहे. महाविकास आघाडीला पाडण्यासाठी केंद्राकडून ईडी व सीबीआयचा वापर करून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार हे आज शुक्रवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. शहरातील आकाशवाणीचौकातील राष्ट्रवादी कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेवून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आ. पवार म्हणाले की, कोरोनाकाळात मजूरापासून ते शेतकर्यांपर्यंत सर्वांना आधार देण्याच काम महाविकास आघाडी सरकार करीत आहे. यातच केंद्रात लसीकरणाचे शंभर कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यंदा दोन वेळा वादळ आल तर अनेकदार अतिवृष्टीचा देखील सामाना देखील करावा लागला आहे. परंतु अशा परिस्थितीत राज्य सरकाने कर्ज काढून शेतकर्यांसह, व्यापार्यांसह शासकीय कर्मचार्यांना वेळेवर मदतीचा हात दिला आहे. केंद्राकडे राज्याचे ३५ हजार कोटी रुपयांचा निधी अडकला आहे. परंतु विरोधीपक्षाकडून हा निधी आणण्याबाबत एक पत्र सुद्धा देण्यात आले नसून त्यांच्याकडून गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आ. रोहीत पवार यांनी केला.
कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
आ.पवार पुढे म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी देखील जोमाने कामाला लागावे यापुढे स्थानिक निवडणुकीत भाजपला सत्तेवर न येवू देण्यासाठी तसेच आपल्या विचारच सरकार आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा सल्ला आ. पवार यांनी दिला. तसेच १ डिसेंबरपासून राज्यात मतदार नोंदणी सुरु होत आहे. त्याची तयारी देखील करावे असे आवाहन केले आहे.