जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त एक दिवशीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन कॅन्सर सुपरस्पेशालिस्ट डॉ. निलेश चांडक यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील बळीराम पेठ परिसरातील ओक मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना १६ वा वर्धापन दिनानिमित्त विनामूल्य भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार दि. ९ मार्च रोजी मनसे शहर उपाध्यक्ष अश्विन सुरेश भोळे यांनी केले आहे. हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरात स्त्रियांचे आजार, बालरोग, हृदयरोग, मधुमेह तपासणी, पोटाचे आजार, अस्थिरोग (हाडांचे आजार), त्वचेचे आजार, संधिवात, मेंदू, किडनी, मूत्रविकार, मुळव्याध, भगंदर, पिशर, पचन विकार या सर्व आजारांवर शिबिरात मोफत तपासणी व मोफत औषधे मिळणार आहे. तसेच नेत्र तपासणी आणि चष्मे सगळ्यांना औषधे मोफत दिली जाणार आहेत. रक्तदान शिबिर, लघवी, रक्त शुगर, युरिक ऍसिड तपासणी सगळ्यांना रिपोर्ट शिबिरात देण्यात येणार आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे संदीप ढंढोरे, शहर उपाध्यक्ष अश्विन भोळे, विनोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे, रज्जाक शेख, कुणाल महाजन राज चंदनकर, कपिल पाटील रुपेश पाटील, मयूर विरपणकर, नितीन चदनकर , मयूर रतवेकर, भरत छत्रीवाला साजन पाटील आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/699945891366512