महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण उत्साहात

जळगाव महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर सोमवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते सकाळी ७ वाजता शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शासकीय कार्यालयात करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगाव महानगरपालिकेच्या आवारात ध्वजारोहण १ मे रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आले. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड, यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दरम्यान विविध विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Protected Content