महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही, महाराष्ट्र पोलीस उत्तमच : फडणवीस

पुणे (वृत्तसंस्था) सुशांत प्रकरण सीबीआयकडे पाठवण्याची मागणी झाली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. मात्र महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

 

 

देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मी पाच वर्ष राज्याच्या पोलिसांबरोबर काम केले. त्यांची क्षमता मला माहिती आहे. मात्र अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करु नये, अशी आमची अपेक्षा आहे, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, पार्थ पवारांचा विषय पवार कुटुंबियांचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्हाला पडायचे नाही. तसेच देशातील एकूण मृत्यूंपैकी ४० टक्के मृत्यू राज्यात होतात, हे गंभीर आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Protected Content