मुंबई वृत्तसंस्था । राज्य सरकारच्या वतीने एकूण १२ हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ५ हजार २९५ पदांची भरती करण्यात येणार आहेत अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मोठया प्रमाणात गुन्हे घडत असतात असा आरोप केला जातो. मात्र, काही वर्षांच्या तुलनेत येथील गुन्हेगारीचे प्रमाण झपाटयाने कमी झाले आहे. नागपूरमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर येथे पोलीस यूनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच १२ हजार पोलीस हवालदारांची भरती करण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात ५ हजार २९५ पदांची भरती करण्यात येणार आहेत अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात याबाबत संबंधितांना लवकरच आदेश देण्यात येतील असे ते म्हणाले.