महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६३ वर पोहोचला !

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाचे एका दिवसात ११ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ५२ होता, जो आज वाढून ६३ वर पोहोचला आहे. नवीन ११ रुग्णांपैकी १० रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

राज्यातील नवीन ११ रुग्णांपैकी ८ जण परदेशातून आले होते, तर तीन रुग्णांना थेट संपर्कातून कोरोनाची लागण झाली आहे. स्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावे आणि गरज नसल्यास बाहेर पडू नये, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत देशात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content