Home आरोग्य महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१वर पोहचली

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या १०१वर पोहचली


मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आज राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०१ झाली आहे. पुण्यात ३ तर साताऱ्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला आहे.

काल राज्यातील ८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९७ वर पोहोचली होती. सांगलीत ४, मुंबईत ३ आणि साताऱ्यात एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली होती. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरून आल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, देशभरात दररोज करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत.


Protected Content

Play sound