भुसावळ, प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विषयक दोन विधेयक मंजूर झाली. शेतकऱ्यांच्या जीवनातला हा ऐतिहासिक निर्णय असुन, शेतकरी बंधनमुकत झालेला आहे. शेतकरी स्वातंत्राच्या नवीन पहाटेचा उदय असल्याने हे विधेयक महाराष्ट्रात ही लागू करावे अशी मागणी भाजप च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, कृषी विधेयकामुळे शेतकऱ्याच्या पदरात त्याच्या घामाचे पूर्ण दाम मिळणार आहे. खऱ्या शेतकरी आझाद झालेला आहे. हा दिवस ऐतिहासिक असून शेतकरी उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य आणि शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण विधेयक मंजूर झाले असून त्यामुळेच देशातील शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहचण्याचा मार्ग मोकळा आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ तर होणारच आहे पण त्यांचे कल्याण सुदधा आहे. दलालांपासून शेतकऱ्यांची मुक्तता झाली असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या प्रयत्नाला हातभार लागणार आहे. किमान हमी भावात शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जाईल. तरी महाराष्ट्र शासनाने हे विधेयक आपल्या राज्यात देखील लागू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार यांना निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, भाजप तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, प्रशांत पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद पाटील, नगरसेवक प्रमोद नेमाडे, बोधराज चौधरी, पवन बुंदेले, अमोल महाजन, सभापती मनीषा पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समिती सदस्य सुनील महाजन, जिल्हा परिषदेच्या सदस्य पल्लवी सावकारे यांची उपस्थिती होती.