महाराष्ट्रातील करोनाग्रस्त्नाची संख्या १२२ वर ; गेल्या तीन तासात आढळले सहा रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या तीन तासात ६ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे. मुंबई पाच तर ठाण्यात १ रुग्ण आढळल्याने ११६ वरुन ही संख्या १२२ वरगेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगीतले की, मंगळवारी संध्याकाळपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ वर पोहचली होती. तर आज सकाळी हीच संख्या ११६ झाली. त्यानंतर आज दुपारून सहा नवे रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे ही संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. परंतू घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

Protected Content