Home Cities भुसावळ महाराणा प्रताप विद्यालयाचे एमटीएस परीक्षेत यश

महाराणा प्रताप विद्यालयाचे एमटीएस परीक्षेत यश

0
39


भुसावळ, प्रतिनिधी । महाराणा प्रताप विद्यालय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय  घेण्यात आले परीक्षेतयश संपादन केले. यात  इयत्ता आठवीचा विद्यार्थी गौरव सुनील सोनवणे हा राज्यात चौदावा आला आहे. 

निषाद मधुकर चौधरी (इयत्ता नववी राज्यात २५ वा), अजित उमाकांत चिमोटे (इयत्ता नववी )उत्तेजनार्थ, विशाल किशोर जोशी (इयत्ता दहावी) तालुकास्तरीय पारितोषिक तर जयेश शरद तायडे (इयत्ता दहावी) तालुकास्तरीय पारितोषिक मिळविले आहे. या सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष . सोनु मांडे, संस्थेचे पालक बापूसाहेब मांडे, चिटणीस उषा पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षिका मंगला मोरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.


Protected Content

Play sound