जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशीराबाद गावातील उड्डाणपूलाजवळ सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार वृध्दाचा मृत्यू झाल्याची २५ फेब्रुवारी रोजी घडली होती.
विजयकुमार मुरलीधर पाटील वय ६० रा. खालची अळी, नशीराबाद असे मयताचे नाव आहे, ते स्वत:च त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने पोलिसांनी स्वत: फिर्यादी होवून दिलेल्या फिर्यादीनुसार या अपघातप्रकरणी १८ दिवसानंतर गुरुवार, १६ मार्च रोजी नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे विजयकुमार मुरलीधर पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी खाजगी कामानिमित्ताने विजयकुमार पाटील हे एम.एच. 19 बी.बी 6933 या क्रमांकाच्या दुचाकीने रावेर तालुक्यातील पिंपळगाव येथे जात होते. या दरम्यान गावापासून काही अंतरावर पोचल्यावर महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहनधारकांना कल्पना यावी म्हणून या ठिकाणी सिमेंटच्या ब्लॉक ठेवण्यात आले. या ब्लॉकचा अंदाज न आल्याने विजयकुमार पाटील यांची दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर धडकली. या अपघातात विजयकुमार पाटील यांचा मृत्यू झाला होता. या घटने प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केली, या विजयकुमार पाटील हे या अपघातास तसेच त्यांच्या मृत्यूस स्वत:च कारणीभूत असल्याने त्यानुसार याप्रकरणी सहाय्यक फौजदार अलीयार खान यांनी फिर्याद दिली आहे, या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.