Home Cities जळगाव महापौरांनी पेढे वाटून साजरा केला श्रीराम मंदिर भूमिपूजन आनंदोत्सव !

महापौरांनी पेढे वाटून साजरा केला श्रीराम मंदिर भूमिपूजन आनंदोत्सव !


जळगाव, प्रतिनिधी । अयोध्याच्या पावन नगरीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला. अयोध्या येथे होणारा हा अनमोल क्षण प्रत्येकाच्या आठवणीत राहणारा आहे. जळगावात महापौर भारती सोनवणे यांनी देखील त्यांच्या घराजवळ फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त महापौर सौ.भारती सोनवणे यांनी घराजवळ आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, दीप्ती चिरमाडे यांच्यासह श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळाचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी जय श्रीराम लिहिलेला भगवा झेंडा फडवत घोषणा दिल्या. फटाके फोडून सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. महापौरांनी सर्व उपस्थितांना पेढे वाटप केले. जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता.


Protected Content

Play sound