जळगाव, प्रतिनिधी । शहरातील गणपती नगरात झाडे झुडपे वाढली असून गटारी तुंबल्याची तक्रार आल्याने शनिवारी महापौर भारती सोनवणे यांनी सकाळीच त्याठिकाणी पाहणी केली. साफसफाई कर्मचाऱ्यांना बोलावून महापौरांनी परिसराची स्वच्छता करून घेतली.
गणपती नगरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारीच्या काठावर झुडपे वाढल्याने आणि गटार फुटलेली असल्याने पाणी तुंबत असल्याचे वृत्त माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ आरोग्य विभागाला सूचना केल्या. सकाळी महापौरांनी स्वतः त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ऍड.जमील देशपांडे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गटारीच्या मुख्य ढाप्यावरून अवजड वाहने गेल्याने गटार तुंबली होती. तसेच अमृत योजनेचे काम करताना बाहेर आलेली खडी गटारीच्या मार्गात अडकल्याने पाणी तुंबत होते. महापौरांनी साफसफाई कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सर्व गटार साफ करून घेतली. गटारीच्या काठावर असलेली सर्व झुडपे काढायच्या सूचना देत लागलीच घंटागाडी बोलावून ते साफ करून घेतले.