जळगाव, प्रतिनिधी । आगामी १८ मार्च रोजी महापौर व उपमहापौर निवडणूक होणार आहे. ही निवड भारतीय जनता पक्षाकडे बहुमत असल्याने बिनविरोध होईल असे अंदाज वर्तविण्यात येत होता. परतू, काल शिवसेनेने आपणदेखील महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याचे जाहीर करून महापालिकेवर आपलीच सत्ता येणार असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. असे असतांना शिवसेनेतर्फे आज महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी चार चार नामनिर्देशन पत्र घेण्यात आलेत.
आज त्यानुसार महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे, व प्रशांत नाईक यांनी घेतले. याप्रसंगी अमर जैन, इबा पटेल उपस्थित होते. याप्रसंगी नितीन बरडे यांनी प्रतिक्रिया देतांना वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण नामनिर्देशन पत्र घेतले असून उद्या हे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येतील असे सांगितले. तसेच महापालिकेत शिवसेनेना बहुमताचा आकडा गाठेल व परवा होणाऱ्या निवडणुकीत त्याचे चित्र स्पष्ट होवून महापालिकेत शिवसेनेची सत्ता येवून भगवा फडकवू असा आशावाद व्यक्त केला.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/473444037345588
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2681094075500127